केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन कोदळी येथे संपन्न

0
केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन कोदळी येथे संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले)

केंद्रीय प्राथमिक शाळा, कोदळी ता . उदगीर येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्रातून अनेक शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यात शांतिनिकेतन विद्यालय कोदळी या शाळेतील इयता दहवीतील अंकिता व संध्या या विद्यार्थिनीने सहभाग घेतला होता. प्रयोगाचे नाव होते दोन आरशामध्ये विशिष्ट कोण केला असता मिळणाऱ्या प्रतिमांची संख्या पाहणे . हा प्रयोग यशस्वीरित्या करून दाखवला. आणि माध्यमिक गटातून शांतिनिकेतन विदयालयाने पहिला क्रमांक पटकावला.
प्रयोग करणाऱ्या विद्यार्थीनी संध्या दत्ता जाधव व अंकिता तानाजी गादगे यांनी उत्कृष्ट पद्धतीने प्रयोगांचे सादरीकरण केले.
विज्ञान विषयांचे शिक्षक भूरे यांनी विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीन मार्गदर्शन केल्यामुळे हे यश संपादित केलेले आहे.त्या मुळे शाळेचे मुख्याध्यापक भोसले यांनी विद्यार्थ्यांचे व भूरे यांचे कौतुक करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *