कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा येथे रक्तदान शिबिर संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्नित डोंगरशेळकी तांडा येथील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम,एच.डी.एफ.सी. बँक.लि. शाखा उदगीर व नागप्पा अंबरखाने रक्तपेढी , उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने ” स्वेच्छा रक्तदान ” शिबिराचे, यशस्वी आयोजन करण्यात आले .
या शिबिराचे उद्घाटन , कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संग्रामजी पटवारी यांनी , वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उद्घाटन केले . याप्रसंगी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.पी.सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. ए. एम.पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ.ए.जी.दापकेकर , रासेयोचे कार्यक्रमाचे अधिकारी डॉ.एस. बी. पवार , उदगीर येथील नागप्पा अंबरखाने रक्तपेढीचे डॉ . शेटकार बी.एम , व्यवस्थापन प्रमुख एच.डी.एफ.सी. बँक.लि. शाखा उदगीरचे श्री. प्रमोद पवार, महाविद्यालयातील प्राध्यापक , अधिकारी , कर्मचारी , विद्यार्थी – विद्यार्थिनी आणि रा स यो स्वयंसेवक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .
डॉ. शेटकार यांनी “रक्तदान ” हेच सर्वश्रेष्ठ दान असून , तरुण-तुरुणिंनी व प्रत्येकानी रक्तदान केलेच पाहिजे , हे एक निस्वार्थ भावनेने केलेले दान आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्य , विद्यार्थी, विद्यार्थिनींनी बहुसंख्येने रक्तदान करावे , असे आवाहन केले . त्यानुसार , महाविद्यालयातील इच्छुक विद्यार्थी – विद्यार्थिनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले . डॉ. संग्रामजी पटवारी यांनी , रक्तदानाचे महत्व , गरज व त्याचे फायदे याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करून आणि रक्तदात्यांचे हार्दिक अभिनंदन करून , शिबिराचा अध्यक्षीय समारोप केला . संस्थेचे सचिव गंगाधररावजी दापकेकर यांचे या रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी पाठबळ व विशेष सहकार्य लाभले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे ऋणनिर्देश , राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. एस. बी. पवार यांनी तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राधिका नाकील व अनुजा कचवे या विद्यार्थिनी केले.