संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे बाल वैज्ञानिक परीक्षेत यश
अहमदपूर ( गोविंद काळे )येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेमार्फत आयोजित डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
30 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या परीक्षेत इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली असून त्यात एकूण 42 विद्यार्थी प्रमाणपत्र फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर तीन विद्यार्थ्यांनी प्रयोग फेरीत प्रवेश मिळवला आहे. मयूर ज्ञानेश्वर उपलवाड, अमृता जयपदम वजीर, आर्या भानुदास दुधाटे या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना
प्राजक्ता भोसले, वैष्णवी शिंगडे व युवराज मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल श्री गणेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील, संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे, अँड. मानसी हाके पाटील, मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर सह पालक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.