उमेदवार किंवा प्रतिनिधी यांनी अद्यावत खर्च अभिलेखासह उपस्थित रहावे – निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. मंजूषा लटपटे
अहमदपूर ( गोविंद काळे ) 236 – अहमदपूर विधानसभा मतदार संघातील निवडणुक लढविलेल्या सर्व उमेदवार यांना कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने उमेदवाराने प्रत्यक्ष केलेल्या खर्चाच्या लेखापुनर्मळ बैठक निकालाची घोषणा तारखेनंतर 26 व्या दिवशी आयोजित करण्याबाबत निवडणूक खर्च सनियंत्रण या वरील अनुदेशाचा सार संग्रह जानेवारी 2024 मधील जोडपत्र C-10 व भारत निवडणूक आयोग क्र. 76/instructions/EEPS/2015/vol-2 दि. 29- 05-2015 असे निर्देश आहेत त्यानुसार लेखापुनर्मळ बैठक दि. 19/12/2024 वार गुरुवार रोजी सकाळी 11.30 वाजता ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालय बार्शी रोड लातूर येथील सभागृहात खर्च निरीक्षक मा. श्री. प्रसंत कुमार काकराला (I.R.S) यांचे अध्यक्षतेखाली उमेदवाराच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लेखापुनर्मळ बाबत बैठक होणार आहे.
तरी 236 – अहमदपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व उमेदवार किंवा त्यांचे नेमणुक केलेले प्रतिनिधी यांनी अद्यावत खर्च अभिलेखासह उपस्थित रहावे असे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. मंजूषा लटपटे, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी उज्ज्वला पांगरकर व नरसिंग जाधव तसेच सहाय्यक खर्च निरीक्षक बी. बी. सपकाळ, नोडल अधिकारी नागेश बुद्धिवंत व सहायक नोडल अधिकारी जी. एन. गोपवाड यांनी केले आहे.