डिजिटल शेतकरी ओळखपत्र ऑनलाईन करुन घ्यावे – प्रशासनाचे आवाहन…. !

0
डिजिटल शेतकरी ओळखपत्र ऑनलाईन करुन घ्यावे - प्रशासनाचे आवाहन…. !

अहमदपूर( गोविंद काळे ) केंद्र शासनाच्या डिजीटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रीकल्चर अंतर्गत, अॅग्रिस्टॅक हा प्रक्ल्प संपुर्ण देशामध्ये राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अॅग्रिस्टॅक योजना राबविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या, कृषी विभागाने निर्णय घेतलेला आहे. अॅग्रिस्टॅक संकल्पने अंतर्गत खालील विविध शेतीविषयक योजनेचा लाभ घेण्यासाठी आता डिजिटल शेतकरी ओळखपत्र ऑनलाईन करुन घेण्यासाठी, अहमदपूर तालुक्यातील ग्रामीण व शहरातील सर्व शेतकरी बांधवानी आपापल्या गांवातील अॅग्रिस्टॅक ग्रामस्तरीय पथका मार्फत (या पथकामध्ये आपापल्या गांवाचे ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्राम पंचायत अधिकारी असणार आहेत. ही योजना आपल्या गावात या पथका मार्फत राबविण्यात येत आहे.) गावात आयोजित केलेल्या विशेष अॅग्रिस्टॅक कॅम्प मध्ये स्वतः उपस्थित होवून मोहीमेंतर्गत करून घेण्याचे आवाहन, उप विभागीय अधिकारी अहमदपूर तथा अॅग्रिस्टॅक तालुकास्तरीय समिती अध्यक्ष डॉ. मंजुषा लटपटे आणि तहसीलदार अहमदपूर तथा अॅग्रिस्टॅक समन्वयक, श्रीमती उज्ज्वला पांगरकर यांनी केले आहे.

या सविस्तर माहिती अशी की, देशातील व राज्यातील अन्नधान्य उपलब्धता, शेती व शेतीशी संलग्न व्यवसाय इ जोपासणे, कृषी मालास साठवणूक सुविधा, योग्य बाजारपेठ, भाव आणि कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देणे हे अॅग्रिस्टॅक योजनेचे वैशिष्ट आहे. या योजनेमुळे शेतकरी असल्याची ओळख, अधिकृतपणे होणार आहे. याशिवाय हे ओळखपत्र तयार झाल्यानंतर शेतकरी स्वतः च्या शेतीसाठी विविध सरकारी योजनेचे शेतीविषयक विविध लाभ सहजपणे मिळवू शकणार आहेत. डिजीटल शेतकरी ओळखपत्र हे आता शेतकऱ्यांचे एक प्रकारचे विशेष डिजिटल ओळखपत्र होणार असल्याने, या ओळखपत्रा अंतर्गत शेतकऱ्यांचे आधारकार्ड मधील आवश्यक माहिती संलग्न केलेली असणार आहे. ज्यामुळे शेतकरी यांची शेतीची माहिती, पिक पद्धती व जमीन याबाबतची संपुर्ण माहिती त्यामध्ये अंतर्भूत असणार आहे. हे ओळखपत्र शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःची विशिष्ट ओळख देणार आहेच तसेच शेतकऱ्यांना स्वतः ला शेतीविषयक सरकारी विविध योजनेचा लाभ मिळविण्यासाठी उपयोग करता येईल. याशिवाय शेतकऱ्यांना या शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून अनेक सरकारी योजनांचा लाभ जसे पिक विमा योजना, शेतीचे कर्ज, पी. एम. किसान योजना, किसान क्रेडीट कार्ड, किसान आधारभूत किमंत, शेतकऱ्यांची नोंदणी अशा विविध योजनेचा यामध्ये समावेश असल्याने इतर आणखी फायदे घेता येणार आहे.

करीता अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचे व ओळखपत्राचे महत्त्व लक्षात घेऊन नोंदणी करून ओळखपत्र तयार करून घ्यावे. हे ओळखपत्र यापुढे अत्यंत महत्वाचे शेतीदस्तऐवज असणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार प्रमाणिकीकरण करण्याची आवश्यकता असणार नाही. शेतकरी बंधूनी यासाठी आपले मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंक केलेले नसल्यास, त्वरित लिंक करून घ्यावे. शासन निर्देशानुसार यासाठी येत्या दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून योजनेमध्ये आपली नोंदणी करण्यासाठी विशेष कॅम्प आपल्या गावात ग्रामस्तरीय पथका मार्फत राबविण्यात येत आहे. या पथकामध्ये आपापल्या गांवाचे ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्राम पंचायत अधिकारी हे असणार आहेत. ही योजना आपल्या गावात या पथका मार्फत राबविण्यात येत आहे. तसेच शेतकरी बंधुच्या सुलभतेसाठी आपल्या गांवात विशेष कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहेत. ज्या दिवशी कॅम्प आयोजित असणार आहे, त्या गांवनिहाय कॅम्प आयोजित केलेल्या तारखा आपापल्या गांवच्या चावडीवर तसेच वर्तमानपत्रातून तहसिल कार्यालया मार्फत प्रसिध्द करण्यात येत आहे.

करीता जास्तीत जास्त शेतकरी बंधूनी आपली नोंदणी आपल्या गावास नियोजन केलेल्या तारखेच्या कॅम्पच्या दिवशी गांवात उपस्थित राहून आपले डिजिटल ओळखपत्र तयार करुन घ्यावे. याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन, नियुक्त ग्रामस्तरीय पथकाकडून घ्यावे व या कॅम्प मध्येच डिजिटल ओळखपत्र त्यांचे मार्फत तयार करून घ्यावे असे आवाहन, उप विभागीय अधिकारी तथा तालुकास्तरीय समिती अध्यक्ष – उप विभागीय अधिकारी, डॉ. मंजुषा लटपटे व तहसीलदार अहमदपूर तथा अॅग्रिस्टॅक समन्वयक श्रीमती उज्ज्वला पांगरकर यांनी केलेले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *