महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या 2024 पुरस्काराने युनिक कंप्‍युटर्स धर्माबादचा गौरव

0
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या 2024 पुरस्काराने युनिक कंप्‍युटर्स धर्माबादचा गौरव

नांदेड (मा.ना.झेंपलवाड) महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची दरवर्षी प्रमाणे विभागीय वार्षिक बैठक लातूर येथे हर्शोल्हासात संपन्न झाली.
सदरील बैठकीमध्‍ये संगणक प्रशिक्षण केंद्रांना विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनीय उत्‍कृष्‍ठ कार्याबद्दल गौरविण्‍यात येते.
पुरस्कार म्हटलं की युनिक कम्प्युटर्स धर्माबादचा उल्लेख प्रामुख्याने होतोच.तसा आजतागायतचां ईतिहासही आहे!
धर्माबाद तालुक्यात युनिक कम्प्युटर्स संगणक प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ च्या अधिपत्याखाली TLC म्हणून कार्यरत आहे.
युनिक कम्प्युटर्स प्रशिक्षण केंद्र ही
सांस्कृतिक परंपरेशी नाळ जोडणाऱ्या उपक्रमांबरोबरच आधुनिक काळातील ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान यांचा स्विकार करत आधुनिक तंत्रज्ञानही विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे, यासाठी संस्था नेहमीच कार्यरत असते.
माहिती तंत्रज्ञानाने जग गेल्या काही वर्षात झपाट्याने बदलत आहे. बदलांचा हाच वेग पत्करत सुसज्ज इमारतीत सुसज्ज संगणक प्रयोग शाळेत ५० अद्ययावत संगणकाच्या सहाय्याने विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांसाठी विविध कालानुरूप आवश्यक अभ्यासक्रमांची योजना राबवीत आहे.
संगणक प्रशिक्षणाचे वयोगटानुसार स्वत:चे अभ्यासक्रम तयार करणे.संगणक विषयाचे कालानुरूप आवश्यक असणारे प्रशिक्षण देणे.
संगणकात विशेष रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगत प्रशिक्षण देणे.
विद्यार्थ्यांना नित्य अभ्यासात संगणकाचा वापर करण्यास शिकविणे. संगणक प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांची कल्पकता, कल्पनाशक्ती , समस्यापरिहार , तार्किकी कौशल्य इत्यादी मध्ये वाढ करणे.
संगणकात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांची अभिरुची संपन्न करणे.
भविष्यात संगणक क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शनामुळे संगणकीय क्षेत्रात धर्माबाद तालुक्याचा प्रगतीचा आलेख नक्कीच उंचावत आहे. म्हणूनच धर्माबाद तालुक्यातील प्रत्येक पालक वर्ग आपल्या पाल्यांना संगणक प्रशिक्षणासाठी युनिक कम्प्युटर्सची निवड प्राधान्याने करतात. युनिक कम्प्युटर्सने आजतागायत प्रशिक्षणार्थीची जपलेली विश्वासार्हता,व्यवस्थापन, संगणक प्रणित विविध माध्यमातून आपल्या तंत्रज्ञान कार्यप्रणालीची सातत्याने अपडेट राहत सुयोग्य पद्धतीने प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्याचा मानस साध्य करत आहेत. युनिक कम्प्युटर्स मध्ये आजतागायत संगणक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित होत विविध कार्यक्षेत्रात, देश विदेशात, शासकिय, निमशासकिय तसेच खाजगी नौकरी करत बहुमान उंचावत आहेत. त्यासोबतच संगणक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खाजगी व्यवसायातून स्वावलंबी जीवनमान उंचावण्यासाठी आदर्शवत ठरत आहेत.
या संपूर्ण समर्पित कार्याची पावती विविध पुरस्काराची सातत्यपूर्ण मालिका कायम ठेवत, महाराष्ट्र ज्ञान महामंडळचा बहुमूल्य सन 2024 या वर्षीचा बहुमान नांदेड जिल्‍हयातील धर्माबाद येथील युनिक कंप्‍युटर्सला मिळाला आहे. या वर्षीचा सदरील पुरस्कार हा समाज माध्‍यमांमध्‍ये सर्व स्‍तरावरील सशुल्‍क जाहिरातीद्वारे विपणन केल्‍याबद्दल मिळाला आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वीणा कामत, मुख्य व्यवस्थापक अतुल पतोडी, अमित रानडे, नटराज कनकधोंड, विभागीय व्यवस्थापक कोशल ओहोळ, विभागीय समन्वयक महेश पत्रिके, जीवन लेंभे, जिल्हा समन्वयक पंढरीनाथ आघाव इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्‍मानचिन्‍ह देऊन गौरविण्‍यात आले आहे.
युनिक कंप्‍युटर हे शहर आणि तालुक्यातील सर्वात अग्रगण्य संगणक प्रशिक्षण संस्‍था असुन सदरील प्रशिक्षित झालेले विद्यार्थी देश-विदेशात शासकीय, खासगी नोकरीमध्ये कार्यरत आहेत. या संस्‍थेमध्‍ये टॅली, डीटीपी, ऑफीस असिस्‍टंट, अॅडव्‍हान्‍स एक्‍सल, सी, जावा इत्‍यादी अनेक अभ्‍यासक्रम शिकविले जातात. ज्‍याची भारतातच नव्‍हे तर विदेशात सुध्‍दा सदरील संगणकीय अभ्‍यासक्रम प्रशिक्षीत विद्यार्थ्‍यांनां उत्तम संधी उपलब्‍ध करत असल्याची माहिती युनिक कम्प्युटर्सचे संचालक किशोर पाटील व शेख म.रफिक
यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *