अमित शहा यांच्या “त्या” विधानाचा वंचित बहुजन आघाडी कडून निषेध
उदगीर (एल.पी.उगीले)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निदर्शने करून, त्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. तसेच अमित शहा यांनी भारतीय जनतेची माफी मागावी. अशी मागणी करणारे निवेदन महसूल प्रशासनाच्या मार्फत शासनाला पाठवण्यात आले आहे.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सचिन गंगाराम जाधव, पी डी कांबळे, रमजान तांबोळी, दिलीपराव कांबळे, कांबळे विजयकुमार, घोरपडे बंटी, गायकवाड अविनाश, कांबळे उत्तम, गौतम सोमवंशी, प्रवीण माने, विकास वाघमारे, संजय कांबळे, हमीद शेख, सोहेल शेख, नामदेव सूर्यवंशी, प्रतीक कांबळे, दत्ता गायकवाड इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.