शास्त्री प्राथमिक शाळेत संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी.
उदगीर(एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना थोर समाजसुधारक, स्वच्छता अभियानाचे जनक संत गाडगेबाबा यांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर, प्रमुख वक्ते म्हणून सचिन आगलावे उपस्थित होते.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
प्रमुख वक्ते सचिन आगलावे यांनी संत गाडगेबाबा यांनी दीन -दलितांसाठी शाळा काढल्या.अन्नक्षेत्र सुरू केले.ते गावोगावी फिरुन,आपल्या किर्तनातून शिक्षणाचे महत्त्व व स्वच्छतेचा संदेश देत असत. असे सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली.संत गाडगेबाबांच्या महान कार्याविषयी सविस्तरपणे माहिती विद्यार्थ्यांना दिली.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी संत गाडगेबाबांनी सांगितल्या प्रमाणे अंधश्रद्धा बाळगू नका.आपले घर जसे स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे आपल्या घराचा परिसर,वर्ग, शालेय परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.सुत्रसंचलन सौ मंजुषा पेन्सलवार बाईंनी केले.