मराठा सेवा संघाच्या वतीने मान्यवरांचा व कोरोना योध्याचा सन्मान

मराठा सेवा संघाच्या वतीने मान्यवरांचा व कोरोना योध्याचा सन्मान

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील मराठा सेवा संघाच्या वतीने विविध पक्षातील निवड झालेल्या नूतन मान्यवरांचा व कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कार्य केलेल्या कोरोना योध्याचा सन्मान करण्यात आला.
मराठा सेवा संघाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर विद्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.गोविंद शेळके तर प्रमुख सत्कार मूर्ती भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड हेमंत भाऊ पाटील, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष अविनाश मंदाडे, डॉ.हरिभाऊ केंद्रे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते दत्ताभाऊ गलाले, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अशोकराव चापटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
ज्या ज्या वेळी आपल्यावर संकट येतात त्या त्या वेळी आपण इतरांना मदत केली पाहिजे. कोरोना महामारीच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना योध्यानी समाज कार्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून काम केले. मराठा सेवा संघ हे सामाजिक बांधिलकी जोपासून सर्वांना न्याय देण्याचे काम करते मराठा सेवा संघ म्हणजे आदर्शवत सेवा संघ असून दीन दलित, शोषित, पीडित, उपेक्षितांच्या पाठीमागे सदैव उभा असतो.असे विनायकराव पाटील यांनी सांगितले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना दिलीपराव देशमुख, ॲड हेमंतराव पाटील,अविनाश मंदाडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या, कोरोना महामारी च्या काळात काळात अहमदपूर शहरातील प्रवीण डांगे, गोपीनाथ जायभाये, नयुम शेख, शंकर मुळे, विलास शेटे, माधव भदाडे, अनिल चव्हाण, सुरज पाटील,शिवाजी गायकवाड यांनी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण पुरविल्या बद्दल मराठा सेवा संघाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष नाना कदम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम माने व आभार अशोकराव चापटे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवा संघाचे धनंजय उजनकर, कार्याध्यक्ष ज्ञानोबा भोसले, उपाध्यक्ष प्रा.मारोती बुद्रुक पाटील, शहर सचिव सचिन जगताप, सुनील देशमुख, बालाजी कदम, सिद्धार्थ दापके, शिवशंकर लांडगे, शिवानंद भोसले, प्रशांत माने, संतोष पाटील, विलास आगलावे,दत्ता कदम,सुनिल पाटील लांजीकर,राम सूर्यवंशी,सोपान कदम, आदींनी प्रयत्न केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!