चाकूर शहरात आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते 50 लक्ष रुपये रस्त्यांच्या कामाचे उदघाटन
अहमदपूर ( गोविंद काळे ) : चाकूर मतदारसंघातील चाकूर येथे वैशिष्ट्यपूर्ण ठोक योजनेअंतर्गत 50 लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्यांचे कामाचे उदघाटन केले. यामध्ये 25 लक्ष रुपये प्र. क्र 2 मधील सिमेंट रस्ता, 20 लक्ष रुपये प्र. क्र.2 मधील श्री. नंदू पाटील यांचे घर ते लातूर – नांदेड रस्त्यापर्यंत. तसेच 5 लक्ष रूपये सत्यसाई रोड ते गणेश कांबळे यांचे घर व अंगणवाडी ते नांदेड रस्त्यापर्यंत, या विविध सिमेंट रस्त्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर उच्च दर्जाच्या रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याच्या सूचना यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती तथा नगरसेवक करिम साहेब गुळवे होते.
व्यासपीठावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष गुणवंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गणेशराव फुलारी, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष पप्पू भाई शेख, शिवसेनेचे शहराध्यक्ष बाळू जाधव, माजी नगराध्यक्ष मिलिंदराव महालिंगे, नगरसेवक इलियास सय्यद, जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, माजी जी प सदस्य दयानंद सुरवसे,राहुल सुरवसे ,राम फुले,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मार्कंडेय, अर्जुन मद्रेवार, शिवदर्शन स्वामी, पांडुरंग धडे, नागोराव पाटील, अनिल वाडकर, अंकलकोटे सिद्धेश्वर, लातूर रोड उपसरपंच उपसरपंच अब्दुल भाई शेख,ऍड संतोष गंभीरे, विवेकानंद शिंदे, संदीप शेटे, सूरज शेटे, गणेश आलमाजी, नागेश बेरोळे, समाधान जाधव, सह विविध मान्यवर उपस्थित होते.