निराधारांसाठी संगांयोचे ‘समाधान शिबिर’

निराधारांसाठी संगांयोचे ‘समाधान शिबिर’

लातूर ग्रामीण संगांयो समितीचा उपक्रम; गातेगावात केला शुभारंभ

लातूर (प्रतिनिधी) : संगांयो-इंगांयो योजनेच्या लाभार्थ्यांचे गावातच संपूर्ण समाधान करण्यासाठी लातूर ग्रामीणच्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने गावोगावी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून नुकतेच गातेगाव (ता.लातूर) येथे पात्र लाभार्थ्यांची अर्जप्रक्रिया गावातच करुन निराधारांचे समाधान करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमितजी देशमुख यांच्या सूचनेनुसार शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचवण्याचे काम लातूर ग्रामीणची संगांयो समिती सहकारमहर्षी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख व आमदार धिरजजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.

लातूर तालुक्यातील गातेगाव येथे समाधान शिबीर उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. त्या शिबिराचे उद्घाटन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नाथसिंह देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी लातूर ग्रामीण संगांयो समितीचे अध्यक्ष प्रविण हणमंतराव पाटील यांनी उपस्थित निराधारांना योजनेबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांच्याशी सुसंवाद साधला. या शिबिरात संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजनेच्या अर्जासाठी आवश्यक शपथपत्र, उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे जागेवर उपलब्ध करुन संबंधित अर्ज दाखल करणे आदी प्रक्रिया या समाधान शिबिरात करण्यात आली. यासाठी संगांयो समितीचे सदस्य परमेश्वर पवार व अमोल देडे, राजकुमार सुरवसे, मंडळ अधिकारी त्र्यंबक चव्हाण, तलाठी स्मिता आळंगे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विरसेन भोसले, मा. पंचायत समिती सदस्य किशोर माळी, सरपंच नागनाथ बनसोडे, उपसरपंच ज्ञानेश्वर जुगल, ग्रामपंचायत सदस्य शंकर देशमुख, शिवरूद्र चौंडे, लाला सरवदे, तानाजी पाटील, जगन्नाथ मोरे, राम माळी आदींनी सहकार्य केले.

लातूर तालुक्यातील निराधारांना ‘संगांयो-इंगांयो’ योजनेचा लाभ व्हावा, योजनेपासून कोणी वंचित राहू नये, यासाठी समितीच्या वतीने गावपातळीवर अर्ज प्रक्रियेचे सुलभीकरण करण्यात येत आहे. यासाठी महसूल प्रशासनाच्या सहकार्याने गावोगावी समाधान शिबिरे घेण्यात येणार आहेत. या शिबिरात निराधारांना योजनांची माहिती देऊन त्यांची अर्ज दाखल प्रक्रिया गावातच करण्यात येत असल्याची माहिती लातूर तालुका ग्रामीणच्या संगांयो समितीचे चेअरमन प्रविण हणमंतराव पाटील यांनी दिली.

About The Author

error: Content is protected !!