महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना अभिवादन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने थोर समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर सोनखेड येथील लोकमान्य महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. गोविंद घोगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते थोर समाज सुधारक तथा स्वच्छतेचे अग्रदूत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ दुर्गादास चौधरी, प्रो. डॉ.अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे, प्रो. डॉ. नागराज मुळे, डॉ. प्रशांत बिरादार,डॉ. सचिन गर्जे, डॉ. संतोष पाटील, प्रा. प्रकाश गायकवाड, प्रशांत डोंगळीकर, शिवाजी चोपडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.