डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत यशवंत विद्यालयाचे नेत्र दीपक यश
अहमदपूर (गोविंद काळे) : टीचर्स असोसिएशन मुंबई यांच्या वतीने डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक परीक्षा दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी होऊन त्यात यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केलेले आहे.
सदरची परीक्षा नववी आणि सहावी इयत्तेसाठी असून नववी मध्ये कुमारी फड वैष्णवी शिवशंकर, वलसे अर्जुन बालाजी, हंगरगे सतेज शंकर यांनी तर सहावीतील आरदवाड आयुष्य अंगद सेकंड लेव्हल साठी पात्र ठरलेले आहेत.
या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे सहशिक्षक अमोल लगड, विवेकानंद हुडे आणि यशवंत कोटा पॅटर्न यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
या चारही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शालेय प्रार्थने मध्ये प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपमुख्याध्यापक माधव वाघमारे ,पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजीराव सूर्यवंशी, कोटा पॅटर्नचे प्रमुख खय्युम शेख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या नेत्र दीपक यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र पैके, सहसचिव प्राध्यापक डॉक्टर सुनिता चवळे यांनी अभिनंदन केले आहे.