बाल वयातच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा कडे वळावे शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर ढमाले यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : या जगामध्ये अवघड गोष्ट कोणतीच नसून अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने, श्रद्धेने, मेहनत, परिश्रम करून शालेय अभ्याससोबत बालवयातच स्पर्धा परीक्षेसाठी विशेष वेळ दिला तर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास यशस्वी होतात असे आग्रही प्रतिपादन लातूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणविस्तार अधिकारी श्री मधुकर ढमाले यांनी केले.
ते दि. विस रोजी यशवंत विद्यालयात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन एम एम एस परीक्षा संदर्भात मार्गदर्शन प्रसंगी बोलताना केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे व्यासपीठावर केंद्रप्रमुख दयानंद मठपती, उप मुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोप प्राचार्य गजानन शिंदे यांच्या भाषणाने झाला.
प्रास्ताविक राम तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन श्रीधर लोहारे यांनी तर आभार धनंजय तोकले यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.