गरज वंताना उबदार ब्लॅंकेटचे वाटप ;राजशेखर महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

0
गरज वंताना उबदार ब्लॅंकेटचे वाटप ;राजशेखर महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

गरज वंताना उबदार ब्लॅंकेटचे वाटप ;राजशेखर महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

सुविधा देण्याचे तहसीलदारांचे आश्वासन

अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे उत्तर अधिकारी राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सदभक्त मंडळाच्या वतीने गरजवंतांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले सध्या थंडीचा कडाका वाढला असून शहरानजीक पाल ठोकून असलेले अनेक गरजवंत यांनी उबदार ब्लॅंकेट नसल्याचे बोलून दाखवले होते त्याचा धागा पकडून भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी वीरमठ संस्थान व भक्ती सोळा च्या वतीने यांनी सदर गरजवंतांना उबदार ब्लॅंकेट वाटप करण्याचा उपक्रम घेतला या कार्यक्रमासाठी तहसीलदार उज्वला पांगरकर गटविकास अधिकारी अमोल आंदेलवाड ओम पुणे नगरसेवक अभय मिरकले संदीप चौधरी, रवी महाजन, अनिल कासनाले पत्रकार संघाचे प्रा. स्वामी विश्वंभर शिवाजीराव गायकवाड बालाजी तोरणे पाटील बालाजी पारेकर ,दिनकर मदेवाड मासूम भाई शेख धम्मानंद कांबळे तलाठी महेश गुपिले प्रशांत बिराजदार मुळे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बालाजी कार मुंगी कर यांनी केले तर आभार शिवाजीराव गायकवाड यांनी मांनले.

चौकट : –
पालावरच्या मुलांना आधार कार्ड नाही. पालावर असणाऱ्या पंचवीस ते तीस मुलांना आधार कार्ड नसल्यामुळे शाळेत दाखला होत नसल्यास हे लक्षात येतात तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी सदर मुलांना आधार कार्ड देण्यासंबंधी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले

चौकट : –
घरकुलांची व्यवस्था करा बिगर असणारे सर्व पालावरील 25 ते 30 कुटुंबातून ते नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये राहतात त्यामुळे त्यांना घरकुल योजनेतून घरकुल उपलब्ध करून देता असेल तर द्यावी अशी विनंती आचार्य गुरुराज स्वामी यांनी केली व त्यानंतर याबाबतची तपासणी करून निर्णय घेणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *