लंगडी स्पर्धेत देवर्जन येथील गंगाधरराव साकोळकर विद्यालयाचा संघ प्रथम
उदगीर (एल.पी.उगीले) : जिल्हास्तरीय शालेय लंगडी स्पर्धेत देवर्जन येथील गंगाधरराव साकोळकर पाटील विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.लातूर येथे पार पडणाऱ्या विभागीय स्पर्धेत हा संघ पात्र ठरला असून या संघात सृष्टी रोडगे(कर्णधार)सृष्टी खटके,प्राची चोपडे,निकीता रणक्षेत्रे,अल्फिया पठाण,भक्ती रोडगे,प्रतिक्षा पंतोजी,कावेरी पंतोजी,नंदीनी जाधव,तनुजा कुटकर,नंदिनी उगीले,मानवी भद्रशेट्टे,धनश्री स्वामी आदिचा समावेश होता.या संघास लातूर जिल्हा लंगडी असोसिएशनचे सचिव जयराज धोतरे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशस्वी खेळाडूचे स्वातंत्र्य सैनिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील साकोळकर, सचिव प्रा.ओमप्रकाश साकोळकर, उपाध्यक्ष मनोज साकोळकर, प्राचार्य बाबुराव शिरूरे, लंगडी असोसिएशनचे अध्यक्ष तानाजी सोनटक्के,क्रिडा शिक्षक अशोक तेलंगे, सर्व शिक्षकवृद यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.