महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विभागीय मंडळाची सहविचार सभासंपन्न
उदगीर(एल.पी.उगीले)येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत लातूर विभागीय मंडळ कार्यक्षेत्रातील उदगीर, देवणी आणि जळकोट तालुक्यातील मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांची सहविचार सभा संपन्न झाली. प्रमुख उपस्थिती विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, विभागीय मंडळाच्या प्रभारी सचिव अनुपमा भंडारी, लिपिक राठोड एस. एल. यांची उपस्थिती होती. संस्थेचे सचिव रामचंद्र तिरुके, उपप्राचार्य डॉ.एस. जी. पाटील, उपप्राचार्य एस.जी .कोडचे, पर्यवेक्षक प्रा. एस. वि. मुडपे यांनी मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी झालेल्या सहविचार सभेत मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दहावी व बारावी च्या परीक्षेच्या आयोजनाच्या संदर्भात मंडळ करीत असलेले उपक्रम व घ्यावयाची दक्षता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना रामचंद्र तिरुके यांनी मागील काळात मंडळाच्या वतीने परीक्षा आयोजनात उत्तम सहकार्य मिळाल्याचे सांगून आगामी काळात सुद्धा चांगल्या बाबी आपल्या हातून व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. प्रसाद जालनापुरकर यांनी केले.