मंत्री बाबासाहेब पाटील यांचा २२ डिसेंबर रोजी लातूर जिल्हा दौरा
अहमदपूर (गोविंद काळे) : राज्याचे मंत्री बाबासाहेब पाटील हे रविवार, २२ डिसेंबर २०२४ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंत्री ना. पाटील यांचे २२ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता अहमदपूर तालुक्यातील सांगवी फाटा येथे आगमन होईल. त्यानंतर भक्तीस्थळ येथे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज समाधी दर्शन घेतील. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, टिपू सुलतान स्मारक येथे त्यांचे स्वागत, सत्कार समारोह होईल. त्यानंतर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन, महात्मा बसवेश्वर चौक येथे अभिवादन करतील. हॉटेल भगीरथी समोर त्यांचे स्वागत, सत्कार होईल. त्यानंतर अहमदपूर येथील प्रसाद गार्डन येथे बालाजी विनायक पाटील यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी सदिच्छा भेट देतील. शिरूर ताजबंद येथील बालाजी मंदिर येथे दर्शन, तसेच राजकुमार प्रभाकर चव्हाण यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी सदिच्छा भेट देतील.
ना. पाटील यांचे दुपारी २.१५ वाजता शिरूर ताजबंद येथील शिवछत्रपती नगर येथे इंद्रायणी निवासस्थानी आगमन होईल व राखीव. त्यानंतर शिरूर येथील महादेव मंदिर येथे दर्शन व मंदिर व्यवस्थापन समितीमार्फत स्वागत, सत्कार समारोह कार्यक्रमाल उपस्थित राहतील. शिरूर ताजबंद येथील शिरूर मुखेड रोडवर शिवराज पाटील आंबेगावकर यांच्या आईसाहेब मेडिकल स्टोअर्स उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर मुक्ताई हार्डवेअर उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यानंतर चाकूर बसस्थानकासमोर महायुतीमार्फत आयोजित स्वागत, सत्कार समारंभाला उपस्थित राहतील. चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालय येथे अरविंद शेट्टे यांच्या मुलीच्या विवाहप्रसंगी सदिच्छा भेट देतील. अहमदपूर येथे बालासाहेब पाटील आंबेगावकर यांच्या घरगुती कार्यक्रमाला सदिच्छा भेट देतील. रात्री ८.१५ वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थान येथे आगमन व राखीव