एलसीबीची उत्कृष्ट कामगिरी,10 लाख 86 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त

0
एलसीबीची उत्कृष्ट कामगिरी,10 लाख 86 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त

लातूर (एल.पी.उगीले) लातूर जिल्ह्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी पदभार स्वीकारल्यापासून धडाकेबाज मोहीम सुरू केली आहे. कित्येक अवैध धंद्याला मूठ माती दिली आहे. त्यांच्या या कामगिरी सोबतच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पकडण्यात ही त्यांनी वेळोवेळी मोठी कामगिरी केली आहे. दहा लाख 86 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि त्याची अवैध वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे वाहनही जप्त करण्यात आले आहे. या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केलेले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.
अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक 17/12/2024 रोजी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, एका वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी व कर्नाटक ते परळी व्हाया अहमदपूर वाहतूक होणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 17/12/2024 सकाळी अहमदपूरकडे जाणारे रिंगरोड वरील शिरूर ताजबंद जवळ सापळा लावून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतले. सदर वाहनाची झडती घेतली असता सदरचे वाहन टोयाटो कंपनीचे इनोवा असे असून त्याचा क्रमांक एम.एच. 44 जी. 3322 असा असल्याचे दिसले. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा वाहनासह 3 लाख 86 हजार 880 रूपयाचा गुटखा व सुगंधित तंबाखू ,व कार किंमत 7 लाख, एकूण 10 लाख 86 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या परळी कडे घेऊन जात असताना गुटख्याची वाहतूक करीत असताना मिळून आलेला आलेले इसम नामे मुस्तकीम खान इस्माईल खान उर्फ पठाण, (वय 25 वर्ष, राहणार मलकापूर रोड, परळी वैजनाथ, जिल्हा बीड),वसीम अक्रम पठाण, (रा. आजाद नगर, परळी वैजनाथ, जिल्हा बीड), सचिन गुट्टे, (रा. जलालपूर परळी वैजनाथ, जिल्हा बीड). अण्णा, (रा. कमालनगर, जिल्हा बिदर राज्य कर्नाटक).यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे अहमदपूर चे पोलीस अधिकारी, अंमलदार करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अमलदार राहुल सोनकांबळे, युवराज गिरी, मोहन सुरवसे, मुन्ना मदने, यांनी पार पाडली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *