पोलीस कर्मचाऱ्याला बुटाने मारून आरोपी फरार, गुन्हा दाखल
उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीतील नांदेड – बिदर रोडवर वाढवणा पोलीस स्टेशनचे कर्मचारी इकराम बशीरसाब उजेडे हे वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीतील उदगीर – नांदेड रोडवर भगवान सिंग बयास यांच्या शेताजवळ एम व्ही ऍक्ट च्या केसेस करत असताना, शासकीय कामात अडथळा आणत आरोपीतांनी आमच्या बोलेरो पिकप (एम एच 24 ए बी 80 97) या गाडीवर पाचशे रुपयांचा फाईन का मारला? म्हणून मनात राग धरून फिर्यादीस शिवीगाळ करून बुटाने मारहाण केली, आणि गाडी जर अडवला तर गाडी अंगावर घालून जीवे मारतो. अशी धमकी देऊन गाडी घेऊन पळून गेले. फिर्यादीस बळाचा वापर करून शासकीय काम करण्यापासून परावर्त केले. अशा पद्धतीची फिर्याद इकराम उजेडे यांनी दिल्यामुळे आरोपी राजेंद्र नागोराव साखरे (वय 55 वर्ष रा. कुमदाळ), राहुल विनायक बिरादार (वय 35 वर्ष रा. करखेली), अमोल विजयकुमार बिरादार (वय 30 वर्ष रा. करखेली), मजलस विनायक बिरादार (वय 55 वर्ष रा. करखेली) यांच्याविरुद्ध गु.र. न. 311 /24 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम के गायकवाड हे करत आहेत.