दुर्गादेवी तांडा (शिरोळ) येथे माफसू वर्धापनदिनानिमित्त पशुआरोग्य शिबिरात ३८८ पशुधनावर औषधोपचार
उदगीर (एल.पी.उगीले) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर च्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर मार्फत उन्नत भारत अभियान अंतर्गत शिरोळ गावातील दुर्गादेवी तांडा येथे पशुआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. नंदकुमार गायकवाड यांच्या हस्ते गोपूजन करून करण्यात आले. उद्घाटन समयी शिरोळ ग्रामपंचायत उपसरपंच सौ. सुशीला सुनिल जाधव, शैक्षणिक पशुचिकित्सा संकुल प्रमुख डॉ. संजीव पिटलावार, औषधीशास्त्र विभागाचे तज्ञ डॉ. सुरेश घोके, डॉ. प्रशांत मसारे,डॉ. रविंद्र जाधव, सुनिल जाधव, भाऊराव आडे, प्रल्हाद नारायण आडे, संजू मनोहर आडे, देविदास तुकाराम राठोड व तांड्यावरील नागरिक उपस्थित होते. शिबिरामध्ये आजारी पशुधनावर उपचार करण्यात आले. शिबिरात एकूण २०६ जनावरांमध्ये बाह्यपरजीवी निर्मुलनासाठी फवारणी करण्यात आली, शेळ्या-मेंढ्या व गोवंशामध्ये एकूण १५४ पशुंचे जंतनिर्मुलन करण्यात आले, व विविध आजाराने बाधित ९ पशुधनावर उपचार करण्यात आले. तसेच पशुधनाच्या आहारातील खनिजक्षार मिश्रणाचे महत्व अधोरेखित करणेसाठी सर्व पशुपालकांना खनिजक्षार मिश्रण वाटप करण्यात आले. विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित जागतिक रेबीज दिन साजरा करून तांड्यावरील पाळीव एकूण १९ श्वान व मांजर यांना रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. शिबिराधील विविध योजनांचा लाभ तांड्यावरील एकूण ३८८ पशुधनास देण्यात आला. शिबिरातील विविध उपक्रम पार पडण्यासाठी डॉ. संजीव पिटलावार, डॉ. सुरेश घोके, डॉ. प्रशांत मसारे यांनी मार्गदर्शन केले तर पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. संस्कृती धुमारे, डॉ. राजेश लावरे, डॉ. योगेश भोसले तसेच अंतिम वर्षाचे विद्यार्थी सुजय लवटे, रोहित कोंडेकर, अस्मिता करुळेकर, वैष्णवी कोरडे, जयदेव मरकड, महेश कृपाल, कैलास मेंगाडे व रोहित कोंडेकर यांनी बाह्यनिर्मुलन फवारणी, जंतनिर्मुलन व औषधोपचार यामध्ये हिरीरीने सहभाग नोंदवून शिबिर यशस्वी केले.