श्यामलाल हायस्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा.
उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस शाळेचे पर्यवेक्षक राहुल लिमये, गणित विभाग प्रमुख संजय पाटील तसेच गणित शिक्षक यांनी पुष्पहार व पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने असलेली गणित विषयाची भीती दूर करण्यासाठी गणितातील गमती जमती, सूत्रे, मॉडेल्स प्रतिकृती, आराखडे यांचे प्रदर्शन शाळेच्या दर्शनी भागात भरवण्यात आले, यामध्ये शाळेतील शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व गणित विषयाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने श्रीनिवास रामानुजन यांचे गणितातील मोठे कार्य व रोजच्या जीवनातील गणिताचे महत्त्व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून, कवितेतून, उखाण्यातून उपस्थित सर्वांना सांगितले.
राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने शाळेतील ज्येष्ठ शिक्षक देबडवार संजय तसेच शिवप्रसाद आंबेगावे यांनी गणित विषयाचे महत्त्व यावर मनोगत व्यक्त केले. तसेच सर्वांनी गणित विषयाचा अभ्यास मन लावून करावा, त्याचा फायदा आयुष्यभर आपणाला होईल असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या सूत्रसंचालन गणित शिक्षिका चंदे अंजली यांनी केले, तर आभार व्यक्त करण्याचे कार्य राहुल नादरगे यांनी केले.