शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय विकसित भारत पीपीटी चॅलेंज स्पर्धेसाठी निवड

0
शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय विकसित भारत पीपीटी चॅलेंज स्पर्धेसाठी निवड

उदगीर -शिवाजी महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी वैष्णवी श्रीकांत पाटील हिने भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2024 अंतर्गत घेण्यात येत असलेल्या स्पर्धेमध्ये पहिले दोन टप्पे अनुक्रमे प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धा यशस्वीपणे पार केली असून तिची 26 डिसेंबर 2024 रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बालेवाडी पुणे येथे होत असलेल्या राज्यस्तरीय विकसित भारत पीपीटी चॅलेंज स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. त्याबद्दल शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने तिचा यथोचित सत्कार करण्यात आला व तिला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी.टी. शिंदे शिवाजी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे,धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्ता पाटील, श्रीकांत पाटील, महाविद्यालयाचे प्रबंधक बालाजी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. एस.व्ही.शिंदे,डॉ.अनंत टेकाळे, प्रा. बालाजी सूर्यवंशी, सिनेट सदस्य डॉ. विष्णू पवार, प्रा.डॉ.व्ही. डी. गायकवाड तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *