राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करणार्या संबंधित ठेकेदार व अभियंता यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
लातूर (प्रतिनिधी) : लातूर ते जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावरील म्हाडा कॉलनी ते बाभळगाव, भुसणी, निटूरमोड व औराद शाहजनी आदी ठिकाणची अनेक कामे ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत ठेवली आहेत. त्यामुळे अपघात होऊन अनेकांचे बळी गेले. शिवाय या महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे. या महामार्गारील अपूर्ण कामे पूर्ण करावीत, संबंधित ठेकेदार व अभियंता यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आदीसह मागण्यासांसाठी १६ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे सरपंच पांडुरंग रामचंद्र गोमारे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषणाच्या सहाव्या दिवशीही कोणताच संबंधित विभागाचे अधिकारी आले नाहीत यामुळे उपोषणकर्ते गोमारे यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी उपोषण सुरू ठेवले आहे.
लातूर-जहिराबाद महामार्गावरील निटूर ते औराद शहाजानी दरम्यानच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध लांबच्या लांब मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत, त्यामुळे दुचाकीचे टायर अडकून अपघात झाले आहेत, त्या भेगा तात्काळ भस्न रस्त्याचे काम करावे, अपूर्ण राहिलेल्या रस्त्याचे व बाजूची भिंती, पेव्हर ब्लॉक, पूल, रस्त्यावरील स्ट्रीटलाईट, वृक्ष लागवड, सत्याचे सुशोभीकरण व इतर कामे तात्काळ पूर्ण करावीत, ठेकेदार व अभियंता बांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. सदरील महामार्गावर अनेक ठिकाणी बाहन जपिंग होऊन अपघात होत आहेत, ही जपिंग कशामुळे होत आहे बाची माहिती देऊन दुरुस्ती करावी कंत्रटदाराला काळ्या बादीत टाकावे, ठेकेदार व अभियंता यांच्यावर आजपर्यंत या महामार्गावर रस्ता अपघाता मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या मृत्यूस जबाबदार धरून ठेकेदार व अभियंता यांच्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कराबा, आदींसह विवध मागण्यांसाठी १६ डिसेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा लोदगा गावचे सरपंच पांडूरंग गोमारे बांनी निवेदनाद्वारे एम. एस. आर.डी.सी. कार्यालयास दिला होता. त्यानुसार १६ डिसेंबरपासून लोदगा बेचे सरपंच गोमारे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. मात्र अनेकांचा बळी घेणारा लातूर- जहिराबाद महामार्गासंबंधी प्रशासन गप्प का? असा सवाल उपस्थित होत आहे.