सत्कारातून मिळालेली ऊर्जा लेखकांच्या लेखणीला बळ देते.– रामचंद्र तिरूके
उदगीर (एल.पी.उगीले) : सत्कारातून मिळालेली ऊर्जा ही लेखकांच्या लेखणीला बळ देते. असे मत मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर चे उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके यांनी मांडले. ते रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठान च्या वतीने मातृभूमी महाविद्यालयात विविध समित्यांवर निवड झालेल्या भूमिपुत्रांचा सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन रामचंद्र तिरूके बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्या उषा कुलकर्णी,विवेक होळसंबरे, रंगकर्मी प्रतिष्ठिनच्या सचिव ज्योती मद्देवाड यांची उपस्थित होती.पुढे बोलतांना तिरुके म्हणाले, रंगकर्मी प्रतिष्ठानने भुमीपुत्राचा केलेला सत्कार पुढील कार्यासाठी प्रेरणा देणारा असुन विविध समित्यावर झालेल्या निवडी आपल्या कार्यातून सार्थ ठरवतील.या यावेळी मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर च्या उपाध्यक्षपदी रामचंद्र तिरूके , महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ द्वारा मराठी विश्वकोशच्या सदस्यपदी डॉ. नरसिंग कदम, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समीती सदस्य अनिता यलमटे, मराठवाडा साहित्य परिषद बालकुमार साहित्य उपक्रम समिती सदस्य प्रा.रामदास केदार, रसूल पठाण यांची निवड, बालभारती मराठी अभ्यासक्रम पुरक वाचन ग्रंथात डॉ. ज्ञानोबा मुंडे, निता मोरे यांची निवड झाली, बालभारती सदस्यपदी प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर ,ज्ञानोबा मुंढे, श्रीमती वडजे या भुमीपूत्रांच्या निवडी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. प्रास्ताविक प्रा बिभीषण मद्देवाड तर सूत्रसंचलन हणमंत केंद्रे यांनी केले. या कार्यक्रमासाठी संदीप निडवदे, रवि हसरगुंडे, संतोष जोशी, सिद्धार्थ सुर्यवंशी आदी उपस्थित होते.