महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे गणित दिवस साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात गणित विभागाच्या वतीने राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गणित विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. बी. डी. करंडे हे अध्यक्ष म्हणून होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. बी. अलापुरे व प्रा. डॉ. व्ही. एस. नागपूर्णे होते. कार्यक्रमास पूजा कोळी व स्नेहा नामवाड या माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रा. डॉ. आर बी अलापुरे म्हणाले, गणित हा विषय माणसाला तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्यास प्रवृत्त करते. अध्यक्षीय समारोप करत असताना प्रा. डॉ.करंडे यांनी श्रीनिवास रामानुजन यांचा जीवन प्रवास सर्व विद्यार्थ्यास सांगितला. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी अरुण मनोहर यांनी त्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी गणित विषयाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत वाघमारे यांनी केले व आभार आशिष शिंदे यांनी मांडले.