अहमदपूर येथे जागतिक ध्यान दिवस साजरा.
अहमदपूर ( गोविंद काळे ) शहरामध्ये डॉक्टर चेरेकर संकुल येथे जागतिक ध्यान दिवस साजरा करण्यात आला. पहाटे साडेपाच वाजता डॉ चेरेकर संकुल येथे 39 सूर्यनमस्कार घेण्यात आले. त्यानंतर भगवान बुद्ध यांनी शिकवलेली आनापान साधना ही बुद्ध वंदना व त्रिशरण तसेच पंचशील यासहित घेण्यात आली त्यानंतर भगवान बुद्ध यांनीच शिकवलेल्या मंगल मैत्री साधनेचा अभ्यास करण्यात आला. या शिबिरासाठी डॉक्टर मेजर मधुसूदन चेरेकर, अशोक तावडे तळणीकर, बाळासाहेब जाधव जिरगेकर, संदेश कुलकर्णी जगळपूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले यावर्षीपासून संयुक्त राष्ट्र संघाने 21 डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार आज पहिलाच जागतिक ध्यान दिवस होता. ध्यानाचे महत्त्व हे आहे की आयुष्यात येणाऱ्या सुखदुःख, ऊन पावसाळे ,लाभ हानी ,यश अपयश, निंदा-प्रशंसा यांना तोंड देण्याचे धैर्य ध्यानामुळे येते, ध्यानामुळे एकाग्रता वाढते, मनाची प्रसन्नता वाढते, मोक्षाचा मार्ग खुला होतो तरी सर्वांनी ध्यानाचा अभ्यास केला पाहिजे असे याप्रसंगी डॉक्टर चेरेकर यांनी सांगितले