अहमदपूर ( गोविंद काळे ) पाश्चिमात्य संस्कृतीमुळे भारतीय संस्कृती आणि परंपरा नष्ट होत असून जीवनात सर्वच क्षेत्रात नेत्र दीपक यश प्राप्ती करण्यासाठी प्रत्येकांच्या मनामनामध्ये आणि घराघरात मुला मुलींनी आपल्या आई-वडिलांचा सन्मान करावा आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाने मार्गक्रमण करावे असे आग्रही प्रतिपादन उपजिल्हाधिकारी मंजुषाताई लटपटे यांनी केले.
त्या दि. 21 रोजी यशवंत विद्यालयात अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस तालुका मंठा आणि मानस फाउंडेशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लातूर जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून बोलत होत्या.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक विरप्पा भुसनुर, उप मुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक शिवाजी सूर्यवंशी, समन्वयक खयूम शेख, परीक्षक प्रा. डॉ. अनिल मुंडे, परीक्षक प्रा. डॉ. बासू भंडारी, प्रा. डॉ. बालाजी कारामुंगीकर, जिल्हा संयोजक राम तत्तापुरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पोलीस निरीक्षक विरप्पा भुसनुर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिस्त आणि संस्काराचे पालन केल्याने जीवन घडते असे सांगितले.
पाचवी ते सातवी च्या प्राथमिक गटामध्ये यशवंत विद्यालयाची कुमारी समीक्षा बालाजी तुडमे सर्वप्रथम, यशवंत विद्यालयाची कुमारी श्रुती बापूराव कांबळे सर्व द्वितीय तर यशवंत विद्यालयाची कुमारी श्रद्धा रामकिशन केंद्रे ही सर्व तृतीया राहिली.
आठवी ते दहावीच्या माध्यमिक गटात यशवंत विद्यालयाची साक्षी कोंडीबा गंगथडे सर्वप्रथम, माध्यमिक आश्रम शाळा सांगवी सुनेगाव ची स्वाती बैकरे सर्व द्वितीय तर माध्यमिक आश्रम शाळा सांगवी सुनेगाव ची बालिका धरणे सर्व तृतीय राहिली.
या विजयी स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुष्पहार, सन्मानपत्र स्मृतीचिन्ह, श्यामच्या आईचा ग्रंथ देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते येथे सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संयोजक राम तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन डॉ. शरद करकनाळे यांनी तर आभार प्रा. डॉ. बालाजी कारामुंगिकर यांनी मांनले.
कथामालेचा शुभारंभ साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राज्य गीताने करण्यात आला.
कथाकथन यशस्वी करण्यासाठी बालाजी सोनटक्के, श्रीधर लोहारे, संतोष पारशेट्टे, राजेश कजेवाड, विजयाताई स्वामी यांच्यासह कथामालेच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.