अहमदपूर(गोविंद काळे): तालुक्यातील रुदया येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल, रुद्धा ता.अहमदपूर येथे काल दि. 24/12/2024 रोजी साने गुरुजी व ख्रिसमस दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संचालक कुलदीप हाके पाटील व संचालिका सौ.शिवालिका कुलदीप हाके पाटील उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये शाळेचे संचालक कुलदीप हाके पाटील यांनी साने गुरुजी यांचे अनमोल विचार मांडले व ते जीवनात आत्मसात सुद्धा करावेत असा संदेश दिला. ख्रिसमस दिनानिमित्त ख्रिसमस वेशभूषा परिधान करून डान्स, नाटक,वकृत्व अशा प्रकारच्या विविध माध्यमातून ख्रिसमस दिन साजरा करण्यात आला. आणि विद्यार्थ्याच्या हस्ते केक कापण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक हरिदास सर यांनी केले व सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी भावेश तेलंग यांनी केले तसेच विद्यार्थ्यांनी साने गुरुजीच्या जीवनावर भाषणे सादर केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.
About The Author