सहकारमंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच मराठा सेवा संघातर्फे सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : राज्याचे नवनियुक्त सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यानी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर हे मंत्री झाल्यावर प्रथमच अहमदपूर दौऱ्यावर आले असता शिरूर ताजबंद येथे मराठा सेवा संघातर्फे ना.बाबासाहेब पाटील साहेब यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मराठा सेवा संघाचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.गोविंदराव शेळके, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशोकराव चापटे , मराठा सेवा संघाचे तालूका कार्याध्यक्ष ज्ञानोबा भोसले , संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते तथा शिव व्याख्याते शिवहार लांडगे , संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते अॅड. आनंद जाधव, राष्ट्रवादीचे युवकचे नेते शैलेश जाधव, मराठा सेवा संघाचे प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार विरेंद्र पवार आदींची उपस्थिती होती.