अहमदपूरच्या रनर्स ग्रुपच्या दोन सदस्यांनी 12 तासात अहमदपूर -मैलार (खंडोबा )-अहमदपूर हे 221 km अंतर पूर्ण केले
अहमदपूर (गोविंद काळे) : भरत इगे आणि सूर्या साकोळे यांनी पहाटे 4:30 वाजता अहमदपूर येथून सुरुवात केली .उदगीर कमालनगर मार्गे 10:30 वाजता मैलार येथे पोहचले तेथे खंडोबा दर्शन घेऊन परत अहमदपूर येथे सायंकाळी 6 वाजता पोहचले
अहमदपूर सायकलिंग ग्रुप च्या या सदस्यांनी HDOR हा 100 दिवस रोज सायकल चालविण्याचा करण्याचा संकल्प केला होता .यात त्यांच्यासोबत 14 अन्य सदस्यांनी या मध्ये सहभाग नोंदवला होता .100 दिवस सायकल प्रवास काय असतो याची माहिती श्री सूर्या साकोळे सरांनी सर्वाना दिली 5km पासून सुरुवात करून दररोज 25km 30km50km60km100km160kmअहमम दपूर तूळजापूर राईड पण पूर्ण करुण 100 व्या दिवशी 221km सायकलींग करण्याची कामगिरी केली .
या स्पर्धेत श्री नामदेव बरुरे ,कृष्णा काळे ,नवनाथ हांडे ,लुल्ला शेख ,धनंजय तोकले ,संतोष पाटील ,कपिल बिरादार ,अभिजीत कराड ,राहुल हिप्परगेकर ,अजबसिंग ,वेदांत राठोड व वय 67 वर्ष वय राहूनही तरुणासोबत त्याच जोशाने सायकलिंग करणारे श्री तम्मेवार सर यांनी सहभाग घेतला
वेगवेगळ्या 5 स्टेज मधील या स्पर्धेत नवनाथ हांडे व कृष्णा काळे यांनी डायमंड मेडल , भरत इगे यांनी प्लॅटिनम मेडल तर बरुरे सर ,साकोळे सर तम्मेवार सर व अजबसिंग यांनी गोल्ड मेडल आणि इतर सदस्यांनी सिल्वर मेडल मिळविले.