मस्साजोग प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, सकल मराठा समाजाची मागणी

0
मस्साजोग प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, सकल मराठा समाजाची मागणी

मस्साजोग प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, सकल मराठा समाजाची मागणी

अहमदपूर (गोविंद काळे) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेचा कट रचणाऱ्या प्रमुख आरोपिसह हत्तेत सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.हे हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी,अशी मागणी येथील एका शिष्टमंडळाने तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे केली आहे.मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली आहे.ही हत्या म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारी आहे.११ दिवसानंतरही या प्रकरणातील सर्व आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही.सर्व फरार आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी.चार दिवसाच्या आत आरोपीला अटक न झाल्यास अहमहपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अन्नत्याग, आमरण उपोषण व तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *