पेन्शनर्स असोसिएशन तर्फे सेवानिवृत्त एकात्मता दिवस चे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर येथे दिनांक 25 डिसेंबर रोजी लातूर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन शाखा अहमदपूरच्या वतीने सेवानिवृत्त एकात्मता दिवस साजरा करण्यात येत आहे. पेन्शनर्स असोसिएशन शाखा अहमदपूरच्या वतीने दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता कैलासवासी हरिभाऊ देशमुख भवन जवाहर कॉलनी अहमदपूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ सेवानिवृत्त सदस्यांचा सत्कार. अहमदपूर तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त सदस्यांची सभा. तेव्हा निवृत्त कर्मचाऱ्यांचा समस्या व
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने विविध विषयावर या कार्यक्रमांमध्ये चर्चा होणार आहे.
या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व सन्माननीय सदस्यांनी कै. हरिभाऊ देशमुख भवन जवाहर कॉलनी अहमदपूर येथे उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे सचिव बी एफ राजपूत व अध्यक्ष मोरे डी बी यांनी केले आहे.