विद्यावर्धिनी विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील विद्यावर्धिनी विद्यालयामध्ये गणित दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे संस्था सचिव तथा मुख्याध्यापिका सुषमा पाटील मॅडम यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन केले.या कार्यक्रमाची सुरुवात गणितीय परिपाठातून झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजा सूर्यवंशी यांनी केले या प्रास्ताविकातून रामानुजन यांच्या जीवनपटाचा थोडक्यात सुंदर पद्धतीने आढावा त्यांनी दिला इयत्ता चौथीच्या मुलांनी गणित विषयाचा इतर विषयाशी संबंध कसा असतो हे आपल्या नाटकामधून अतिशय सुंदर सादर केले.तसेच इयत्ता पाचवीच्या मुलांनी चौरस व त्रिकोणाचे प्रकार सुंदर स्पष्टीकरणासह सादर केले .त्याच बरोबर शाळेतील गणित शिक्षक अफरीन शेख, चांदोबा केंद्रे व उमाकांत श्रीमंगले यांनी मुलांना गणित विषय हा आपल्या आयुष्यात अवघड नसून आपण जर त्या विषयाकडे दैनंदिन व्यवहार म्हणून पाहिले तर गणित विषय खूप सोपा वाटेल हे मुलांना पटवून सांगितले .या राष्ट्रीय गणित दिनानिमित्त श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट मुलांना दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पाटील मॅडम यांनी आपल्या गणित हे आपल्या अवतीभोवती आहे हे गणित आपण जर आपल्या अनुभवातून शिकलो तर गणित विषय समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही ते अतिशय मोजक्या शब्दात मुलांना समजावून सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववीतील विद्यार्थ्यांनी तनिष्का पाटील व अंजली जाधव या विद्यार्थ्यांनी केले व या कार्यक्रमाचे आभार श्री हबडे सर यांनी मानले.