भारताचे भूतपूर्व केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची घेतली माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सदिच्छा भेट

भारताचे भूतपूर्व केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची घेतली माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सदिच्छा भेट

लातूर (प्रतिनिधी) : भारताचे भूतपूर्व केंद्रिय गृहमंत्री तथा पंजाब चे माजी गव्हर्नर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवराजजी पाटील चाकूरकर यांच्या देवघर लातूर येथील निवासस्थानी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी जावून सदिच्छा भेट घेतली त्यांचा पुष्पगुच्छ शाल देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर व माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी विविध विषयवार चर्चा केली याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, जागृती शुगर कारखान्यांचे उपाध्यक्ष लक्ष्मण राव मोरे, रेणा साखर कारखान्यांचे व्हाइस चेअरमन अनंतराव देशमुख, प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया सरचिटणीस हरिराम कुलकर्णी, उत्तमराव जाधव, सचिन दाताळ, उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!