देश आणि धर्मासाठी जोरावरसिंह व फतेहसिंहांनी बाल वयात वीरगती स्वीकारली – डॉ. पांडुरंग चिलगर
अहमदपूर (गोविंद काळे) : शीख धर्माचे दहावे गुरु गोविंद सिंह यांचे पुत्र बाबा जोरावरसिंह यांनी वयाच्या पाचव्या वर्षी तर बाबा फतेहसिंह यांनी वयाच्या सातव्या वर्षी देश आणि धर्मासाठी वीरगती स्वीकारली, असे स्पष्ट प्रतिपादन उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी तथा महात्मा फुले महाविद्यालयातील हिंदी विभागाचे सहयोगी प्राध्यापक व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल वीर दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर डॉ. पांडुरंग चिलगर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्तेबाबा जोरावरसिंह व फतेहसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी पुढे बोलतांना डॉ. चिलगर म्हणाले की, मुघलांच्या जुलमी राजवटीमध्ये मोठ्या प्रमाणात जबरदस्तीने धर्मांतर केले जात होते. त्याच काळात २६ डिसेंबर १७०५रोजी मुघलाचे सेनापती वजीर खान यांनी पंजाब प्रांतावर आक्रमण करून गुरुगोविंद सिंह यांच्या दोन्ही मुलांना बंदिस्त करून मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी छळ सुरू केला परंतु बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांनी आपल्या देशाच्या अखंडतेसाठी व धर्मासाठी वीर मरण पत्कारणे मान्य केले हे दोन्ही बालक बाल वयात शहीद झाले,असे ही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी गुरु गोविंद सिंग आणि त्यांच्या मुलांचा शौर्यावर भाष्य करतांना गुरू गोविंदसिंगाच्या लोककल्याणकारी राज्य कारभारावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. प्रशांत बिरादार यांनी केले तर आभार डॉ. मारोती कसाब यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, प्रोफेसर डॉ. नागराज मुळे, डॉ. किरण गुट्टे ,ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. डी. एन. माने, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. सचिन गर्जे , डॉ.संतोष पाटील, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालय कर्मचारी उपस्थित होते.