माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी विविध संघटना, संस्था पदाधिकाऱ्यांसह नागरीकांच्या घेतल्या भेटी
लातूर प्रतिनिधी : गुरुवार २६ डिंसेबर २४ राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार दि. २६ डिंसेबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संघटना, संस्थांचे पदाधिकारी, नागरिक यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या अडचणी समजून घेतल्या तसेच त्यांच्या निवेदनाचा स्वीकार करून संबंधितांना तात्काळ पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, माजी महापौर दिपक सूळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोईज शेख, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हा. चेअरमन समद पटेल, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, डॉ. अरविंद भातंबरे, महेश देशमुख, चक्रधर शेळके, भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे लातूर जिल्हा सिक्रेटरी कॉम्रेड सुधाकर शिंदे, कॉम्रेड विश्वंभर भोसले, कॉम्रेड संजय मोरे, कॉम्रेड विक्रम गिरी, कॉम्रेड सुरेश कातळे, कॉम्रेड दशरथ कांबळे, सुपर्ण जगताप, अक्षय शहरकर, वैभव सूर्यवंशी, कैलास कांबळे, इमरान सय्यद, युनूस मोमीन, पप्पू देशमुख, दत्ता सोमवंशी, प्रा. शिवाजीराव जवळगेकर, बाळकृष्ण धायगुडे, निलेश देशमुख, बाबा पठाण, प्रवीण सूर्यवंशी, व्यंकटेश पुरी, एन आर पाटील, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत झेरीगुंठे, केशव गंभीरे, महादेव गंभीरे, धर्मवीर भारती, दीपक कोटलवार, श्रीकांत ठोंबरे, ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ बनसोडे, सिकंदर पटेल, शिवाप्पा कोरके, मोहन भालेराव, अमजद पठाण, अफसर कुरेशी, वीरसेन भोसले, उमेश बेद्रे, विजयकुमार धुमाळ, इसरार सगरे, असलम शेख, फारुक शेख, सालार पठाण, युनुस शेख, फिरोज बेग आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.