उदगीरचे सायकलपट्टु निघाले पर्यावरणाचा मृदा संवर्धन संदेश घेऊन अयोध्याला…
अहमदपूर सायकल यात्रेचे जोरदार स्वागत..
अहमदपूर (गोविंद काळे) : उदगीर सायकलिंग ग्रुपचे 42 सायकल स्वार पर्यावरणाचा वर्धा संवर्धन हा विषय घेऊन उदगीर ते आयोध्या असा जवळपास पंधराशे किलोमीटरचा प्रवेश सायकल द्वारे करत असून या यात्री माणसं मूळ उद्देश समाजात पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करून पर्यावरण संवर्धन करणे व यामध्ये मृदा संवर्धन हा विषय त्यांनी सगळ्याकडे मांडला आहे.
या सायकल यात्रेचे अहमदपूर येथे महात्मा गांधी कॉलेज समोर जोरदार स्वागत अहमदपूर सायकलिंग ग्रुप च्या वतीने करण्यात आले..
यावेळी कपिल बिरादार, भरत ईगे, सचिन करकनाळे , संतोष पाटील, आशिष हेंगणे नवनाथ हांडे, आदर्श भालके, अभिलाष पोकर्णा, अभय बिरादार, महादेव खळुरे हे सायकलिंग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
गेली 17 वर्षे उदगीरचा हा सायकलिंग ग्रुप प्रतिवर्षी पर्यावरण विषयक जागृती निर्माण करण्यासाठी भारतरत्न करत असतो. मूळ उद्योग हा पर्यावरण जागृती करणे पक्ष लागवड वृक्ष संवर्धन प्लास्टिक चा वापर टाळणे व मृदा संवर्धन सारखे विषय घेऊन ते कार्य करत असतात.
उदगीरच्या या सायकल यात्रेमध्ये बबनराव हैबतपुरे, रुकमाजी चामले योगीराज बारोळे , पांढरे अश्विन, ममदापूर सुनील, चव्हाण मुकिंद यांच्यासह 42 सायकल पट्टू सहभागी आहेत.
या सायकल यात्रेमध्ये तेरा वर्षाच्या सायकल पट्टू ते 59 वर्षाचे सायकल पट्टू सहभागी आहेत.
यापूर्वी या सायकल ग्रुपने कन्याकुमारी जगन्नाथ पुरी ,केरळ अशी यात्रा पर्यावरण संवर्धन व जागृती हा विषय घेऊन केली आहे.
या उदगीरा ते अयोध्या यात्रेला अहमदपूर ठीक ठिकाणी स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पत्रकार अनिल चवळे, शिवाजीराव गायकवाड हे उपस्थित होते.