राष्ट्रीय ग्राहक दिन -‘पक्की पावती घ्यावी’- दत्तात्रय मिरकले जिल्हाध्यक्ष ग्राहक पंचायत

0
राष्ट्रीय ग्राहक दिन -'पक्की पावती घ्यावी'- दत्तात्रय मिरकले जिल्हाध्यक्ष ग्राहक पंचायत

राष्ट्रीय ग्राहक दिन -'पक्की पावती घ्यावी'- दत्तात्रय मिरकले जिल्हाध्यक्ष ग्राहक पंचायतराष्ट्रीय ग्राहक दिन -'पक्की पावती घ्यावी'- दत्तात्रय मिरकले जिल्हाध्यक्ष ग्राहक पंचायत

अहमदपूर (गोविंद काळे) : विमलाबाई देशमुख कन्या शाळा अहमदपूर येथे डॉक्टर मंजुषा लटपटे उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन दत्तात्रय मिरकले पाटील जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा शाखा लातूर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते झाले. विमलाबाई देशमुख कन्या शाळेच्या मुलींनी स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले‌. या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा सचिव माधव गुंडरे, शिवराज शेकडे, दिलीप पाटील, तालुका अध्यक्ष तुकाराम कदम, तालुका सचिव ज्ञानेश्वर कदम, कोषाध्यक्ष दिलीप कांबळे, सदस्य जयराम पोले, प्रशाला अहमदपूरचे मुख्याध्यापक नागनाथ कदम, प्रांत ग्राहक संरक्षण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले आदी मार्गदर्शक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी केले आणि ग्राहक जागृतीसाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंधरवड्यात १५ ते ३१ डिसेंबरमध्ये विविध उपक्रम घेतले पाहिजेत असे मत व्यक्त केले. त्यानंतर विमलाबाई देशमुख कन्या शाळा व जिल्हा परिषद प्रशाला अहमदपूरच्या मुलींच्या चमुंनी “जागो ग्राहक जागो” या विषयी अतिशय बोलके नाटक सादर करून जागरूक ग्राहक कसा असावा हे उपस्थित विद्यार्थी,पालक आणि मान्यवरांना दाखविले. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात जि.प.प्रशाला अहमदपूरच्या नववीच्या शिवानी वाघमारे हीने ग्राहक दिनाचे महत्व आणि ग्राहक संघटना याविषयी भाषण केले. मार्गदर्शक राजेश भोसले यांनी ग्राहक जागृती संबंधी गोष्टी रूपाने आपले विचार व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दोन्ही नाटकांची खूप प्रशंशा केली. शालेय शिस्तीत असलेले विद्यार्थी पाहून विमलाबाई देशमुख कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता कोयले यांचे आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांचे कौतुक केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरकले पाटील यांनी अहमदपूरच्या ग्राहक दिनाचे नियोजन पुरवठा अधिकारी शुभांगी जवादे यांनी अतिशय चांगले केल्यामुळे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना प्रमाणित केलेली वस्तू खरेदी करावी आणि पक्की पावती घ्यावी असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.पावती घेतली नसल्यास ग्राहकाला ग्राहक आयोगात दाद मागता येणार नाही व फसवणूक झाल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही असे सांगितले. त्यासाठी विद्युत उपकरणे, स्वयंपाकघरातील उपकरणे, विविध यंत्रे यावर आयएसआय मार्क, कृषी उत्पादनावर ऍगमार्क, खाद्यपदार्थावर एफएसएसएआय मार्क आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्क असलेली उत्पादनेच खरेदी करावेत, कारण अशा उत्पादनापासून जीवितास धोका नसतो आणि ती सुरक्षित असतात. सरांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतची रचना व कार्य सांगितले . दुधातील भेसळ रोखण्यासाठी शासनाने प्रयत्न नाही केल्यास आणि घातक रसायनावर बंदी नाही घातल्यास भारतातील 87% लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता डब्ल्यूएचवोने वर्तवली असल्याचे सांगितले अध्यक्षीय समारोपाचे भाषण उपविभागीय अधिकारी डॉक्टर मंजुषा लटपटे यांनी केले. ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते अशासकीय सदस्य आहेत तर आम्ही शासकीय सदस्य असून सर्वांनी एकत्रितपणे ग्राहक जागृतीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यानंतर भाषण व नाटिका सादर केलेल्या दोन्ही शाळांच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करून राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कदम महा-ई-सेवा केंद्र अहमदपूरच्या वतीने ज्ञानेश्वर कदम यांनी नाटक व भाषणात सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले. सूत्रसंचलन पेड सरांनी केले तर आभार येडले सरांनी व्यक्त केले ‌.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *