सुनेगाव शेंद्री येथील जि प प्रा शाळेत शिक्षण परिषद संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुनेगाव शेंद्री येथे दि 28 डिसेंबर रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षण परिषद संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी दयानंद मठपती तर प्रमुख पाहुणे म्हणुन केंद्र प्रमुख आशोक बारमाळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाळ काळे, तंटामुक्ती अध्यक्ष राजू जायभाये, शिक्षण प्रेमी शिवाजी काळे ,ग्रा.प. सदस्य बापुराव जाधव यांची उपस्थिती होती . शिक्षण परिषदेच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेचे पुजन करून करण्यात आली.
जि प प्राथमिक शाळा सुनेगाव शेंद्री येथील विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत ‘ स्वागत गीताने ‘ करून प्रार्थना गीत सादर केले. उपस्थित मान्यवरांनी व शिक्षकांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर शिक्षण परिषदेमध्ये इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता चाचणी यावर श्रीमती मद्देवाड मॅडम ,मौखिक भाषा विकास यावर कांबळे त्रंबक , बेरीज वजाबाकी संबोध यावर गिरी सोहम , रंगोत्सव हाकेथॉन स्पर्धा यावर विट्ठल सांगवीकर यांनी मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या शंकेचे समाधान मुख्याध्यापक राठोड श्रीपत तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांगवीकर विठ्ठल यांनी केले. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक शिंदे रांगाराम यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुरमुरे सर, जाधव सजनिकांत, श्रीमती माळी मॅडम, श्रीमती भोसले मॅडम यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली .अशा रीतीने शिक्षण परिषद या शाळेत यशस्वी संपन्न झाली.