अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून विचारपूस!
चाकूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शिवणखेड (बु.) येथील श्री गणेश विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल कोल्हापूरला घेवून जाणाऱ्या खाजगी बसला सोलापूर जिल्ह्यात अपघात झाला होता. या शाळेला ना. पाटील यांनी आज भेट दिली, तसेच अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
या अपघाताची माहिती मिळताच राज्याचे सहकार मंत्री ना. पाटील यांनी तात्काळ विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत तातडीने उपचार करण्याची सूचना केली होती. आज लातूर जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांची विचारपूस केली. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.