उमेदच्या बचत गटाचे कार्य ‘ ‘कौतुकास्पद … !

0
उमेदच्या बचत गटाचे कार्य ' 'कौतुकास्पद … !

उमेदच्या बचत गटाचे कार्य ' 'कौतुकास्पद … !

अहमदपुरच्या हीरकणी मुंबईत पोहचल्या…. नवी मुंबई वाशी सरस प्रदर्शन….

अहमदपुर (गोविंद काळे) : उमेद अंर्तगत स्वयंम सहाय्यता समृहातील महिलांनी उत्पादीत केलेल्या पदार्थाचे प्रदर्शन आणि विक्री महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियांना अंर्तगत नवी मुंबई सिडको वाशी येथे १४ डिसेबर ते २५ डिसेबर येथे भरवण्यात आले होते त्याचा निरोप समारंभ २६ रोजी पार पडला यामध्ये तालुक्यातील अनेक बचत गटानी सहभाग नोंदवला होता.
महाराष्ट्र व इतर राज्यातून ५०० हून अधिक स्टॉल आलेले होते त्यामध्ये लातुर जिल्हयातील अहमदपुर तालुक्यातील कोपरा येथील शेंगदाणा लाडू , व उमरगा यल्लादेवी येथील लाकडी बैलगाडी लाकडी जाते, लाकडी बाज लाकडी नांगर , लाकडी पाट, लाकडी तिफण लाकडी खेळणी
व इतर गटातील लाल तिकट , काळे तिकट अनेक पदार्थ प्रदर्शनात तयार केलेले .ठेवण्यात आले होते यावेळी श्रेया बुगडे , चरणजित सिंग अनेक कलाकारांनी या प्रदर्शनाला भेटी देऊन खरेदी केली आर्थिक उलाढाल चांगली झाली असल्याचे गटाचे म्हणणे आहे या वरून असे दिसून येते की महीलाचे गटामार्फत जीवनमान उंचावत आहे महिला या स्वतःच्या पायावर उभे राहून कुंटूबाचा भार सांभाळू शकतात.
यासाठी मार्गदर्शक म्हणून तालुका व्यवस्थापक नवनाथ देगणुरे , शैलेश राख , व प्रभाग समन्वयक यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

अहमदपुर तालुक्यातील गादेवाडी येथील महालक्ष्मी बचत गटाच्या सखुबाई केरबा आयतलवाड या महीलेने घरी शिलाई मशिन घेऊन झुट बँग तयार करून प्रदर्शनात सहभाग नोंदवला आणि या प्रदर्शनात बँगच्या माध्यमातून ८५००० रू आर्थिक ची उलाढाल झाली असल्याचे सांगीतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *