डॉक्टर मनमोहन सिंह यांना छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप ची श्रद्धांजली
अहमदपूर (गोविंद काळे) : जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांना छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप नी योगा मैदानावर आज दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजता भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली
सुरुवातीला डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या प्रथमेश पुष्पांजली वाहण्यात आली व नंतर दोन मिनिट स्तब्ध उभे राहून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली
त्यानंतर छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य श्री डी एस वाघमारे यांनी डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या कार्याचे गुणगान केले
याप्रसंगी छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे अध्यक्ष एन डी राठोड यांनी सांगितले की भारताला महासत्ता बनवण्याचे पहिले पाऊल डॉक्टर मनमोहन सिंग यांनी टाकले होते.
डॉक्टर मनमोहन सिंह यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाल 2004 ते 2014 हा अत्यंत गौरवशाली असा गेलेला आहे.
आर्थिक संकटाच्या काळात भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे कार्य डॉक्टर मनमोहन सिंह यांनी अत्यंत कुशल पणे केलेले आहे.
दीर्घकाळ परिणामकारक ठरतील अशा अनेक योजना त्यांनी त्यांच्या कार्यकाळात चालू केल्या.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, अन्न सुरक्षा योजना, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार अशा योजना त्यांच्या कार्यकाळात चालू केल्या
ते सतत 33 वर्ष राज्यसभेवर होते. ते भारताचे अर्थमंत्री असताना भारताची आर्थिक स्थिती भक्कम सुधारली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक पदे भूषवली. ते अर्थ मंत्रालयाचे सल्लागार होते. ते देशाच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. ते रिझर्व बँकेचे गव्हर्नर आणि पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार ही होते अशा भारत मातेच्या थोर सुपुत्राला आज आपण मुकलो आहे अशी ही त्यांनी सांगितले.