एम्स (AIIMS)भोपाळ येथून डॉ .प्रणव तत्तापुरे एम बी बी एस परीक्षा उतीर्ण
अहमदपूर (गोविंद काळे) : मध्य प्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळ येथील अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थान, भोपाळ च्या वतीने माहे नोव्हेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एम बी बी एस च्या फायनल इयरच्या परीक्षेत डॉ. प्रणव रामलिंग तत्तापूरे यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
कालच त्याचा निकाल घोषित करण्यात आला असून त्यामध्ये 1456 गुण घेऊन यशस्वी झाला आहे. पुढील वैद्यकीय प्रशिक्षणासाठी भोपाळच्या एम्स संस्थेत एक वर्षासाठी अधिकृतपणे नेमणूक देण्यात आली आहे.
यशवंत विद्यालयाचे पर्यवेक्षक राम तत्तापुरे आणि संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे तत्तापुरे यांचा चिरंजीव असून अहमदपूर तालुक्यातील तो (AIIMS)एम्स भोपाळ चा पहिला विद्यार्थी आहे.
त्याच्या या नेत्र दीपक यशाबद्दल टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.अशोकराव सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, श्री गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील, सचिव तथा प्राचार्या रेखाताई तरडे ,भक्ती स्थळाचे प्रमुख प.पू. आचार्य गुरुराज स्वामी यांच्यासह मित्र परिवारांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.