बालाजी बेल्लाळे यांचे दुःखद निधन
अहमदपूर (प्रतिनिधि) : येथील तिरुपती फॅब्रिकेशन चे मालक बालाजी संभाजीराव बेल्लाळे यांचे अल्पशा आजाराने दि.01 रोजी बुधवार सांयकाळी चार वाजता वयाच्या 65 व्या वर्षी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्यावर दि. 02.01.24 रोज गुरुवारी सकाळी आकरा वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात लिंगायत स्मशान भूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा, दोन मुली, सूना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार असून शासकीय विद्युत कंत्राटदार गणेश बेल्लाळे यांचे ते यांचे ते वडील आणि पी एसआय शिवाजी बेल्लाळे यांचे ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.