खेळाडूंनी घेतली उत्कृष्ट खेळाडू असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या माजी व आजी मंत्र्यांची भेट……
अहमदपूर (गोविंद काळे) : नुकतच महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ स्थापन झालं व अहमदपूर साखर मतदारसंघाला कॅबिनेट मंत्री हे पद लावलं ते म्हणजे अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे भाग्यविधाते माननीय नामदार श्री बाबासाहेब जी पाटील साहेब, सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य व ज्यांनी क्रीडा संघटना, क्रीडा संघटक, प्रशिक्षक व खेळाडू अशा क्रीडा क्षेत्रातील सर्वांना राजआश्रय दिला असे माजी राज्यमंत्री श्री बाळासाहेब जाधव, महाराष्ट्र राज्य, यांची लातूर जिल्हा तलवारबाजी असोसिएशन लातूर, अम्यच्युर शूटिंग बॉल असोसिएशन, लातूर व जय हिंद क्रीडा मंडळ अहमदपूर, चे सदस्य आणि तलवारबाजी या खेळाचे खेळाडू व प्रशिक्षक यांनी भेट घेतली.
माननीय बाळासाहेब जाधव साहेब यांनी सर्व उपस्थित प्रशिक्षक व खेळाडू यांना येणाऱ्या काळात उज्वल यश संपादन करण्यासाठी शुभ आशीर्वाद दिले
यावेळी माननीय श्री बाळासाहेब जाधव, माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्राध्यापक दत्ताभाऊ गलाले, अभिजीत मोरे, प्रशांत माने, संतोष कदम, वैभव कजेवाड, प्रशांत भोसले, युवराज पाटील, बालाजी पवार व NIS प्रशिक्षक मोसिन शेख, मेहफूज खान पठाण, सुरज कदम, भाऊराव कदम, अक्षय कदम व आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय पदक प्राप्त खेळाडू यावेळी उपस्थित होते.