महात्मा फुले महाविद्यालयाकडून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याचा मागणी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना भारत सरकारने भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित कराण्याच्या मागणीचा ठराव सर्वांनुमते पारित करण्यात आला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ तथा भारताचे माजी पंतप्रधान स्व. डॉ. मनमोहन सिंग यांचे नुकतेच वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यांना भारतरत्न या पुरस्काराने भारत सरकारने सन्मानित करावे असा ठराव एन. एस. एस. चे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी मांडला तर या ठरावास प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी अनुमोदन दिले. तसेच सर्वानुमते हा ठराव घेऊन महाराष्ट्राचे मा.राज्यपाल तसेच मा. मुख्यमंत्री यांना तहसील कार्यालयामार्फत पाठवून देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, डॉ. सतीश ससाणे, प्रो. डॉ. अनिल मुंढे, प्रो. डॉ. नागराज मुळे, डॉ. प्रशांत बिरादार, प्रो. डॉ. ए. एस. मोरे,डॉ . किरण गुट्टे, डॉ. डी. एन.माने,डॉ. सचिन गर्जे, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. मारोती कसाब , ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. संतोष पाटील,प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामन मलकापूरे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.