जानकी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संघर्ष व ग्रामीण विकास संस्था संचलित जानकी महाविद्यालात सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिवस साजरा करण्यात आला. या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शीतल खोमणे यांनी भूषवले . सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा शीतल खोमणे यांच्या हस्ते करण्यात आले. सावित्रीबाईच्या संघर्ष आणि त्यागाच फलित आहे कि तुम्ही सर्व महिला आज ताठ मानेने आपले जीवन व्यथित करत आहात असे उद्गगार उपस्थित महिला कर्मचारी व विद्यार्थिनींना उद्देशून प्रमुख पाहुण्यांनी काढले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष शीतल खोमणे यांनीही अध्यक्षीय समारोप करताना ‘मी हि विचार मंचावर उपस्थित राहून दोन शब्द बोलू शकत आहे हि सगळी सावित्रीमाईंची देन आहे, त्या नसत्या तर तुमचं आमचं आयुष्य अंधकारमय असतं.’ असे म्हणत सावितीबाई फुलेंप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमात विद्यार्थिनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच महिला कर्मचार्यांच्या कार्याची दखल घेत या दिवसाचे औचित्य साधत त्यांचेही अभिनंदन पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्रा.स्वामी अजय ,प्रा.दीक्षा लामतुरे ,प्रा.देशमुख जोहा ,प्रा. जगताप आकांक्षा .प्रा.आगलावे वैष्णवी ,विद्यासागर धुळगुंडे, रुद्रवाद पांडुरंग,प्रसाद गुंडरे ,प्रसाद सूर्यवंशी, सलीम पठाण व इतर प्राध्यापक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.