भारतातील ‘स्त्री शिक्षणाच्या’ जनक सावित्रीबाई फुले – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

0
भारतातील 'स्त्री शिक्षणाच्या' जनक सावित्रीबाई फुले - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

भारतातील 'स्त्री शिक्षणाच्या' जनक सावित्रीबाई फुले - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

अहमदपूर (गोविंद काळे) : थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अंगावर दगड , चिखल , शेण झेलून पुण्यासारख्या शहरात प्रतिकूल परिस्थिती असताना स्त्रियांसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने भारतातील ‘स्त्री शिक्षणाच्या जनक’ होत्या असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ तथा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने ‘दक्षिण भारत अभ्यास मोहीम’ सुरू असून या मोहिमे अंतर्गत कर्नाटक येथील हॉस्पेट या शहरातील विजयनगर कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयनगर कॉलेजचे प्राचार्य डॉ.एम . प्रभुगौडा हे होते. तर विचार मंचावर प्रोफेसर डॉ.महंतेश, प्रोफेसर डॉ. संपत ,प्रोफेसर डॉ. शिवकुमार,अंडर ऑफिसर अनुशा यांच्यासह महात्मा फुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. किरण गुट्टे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर , प्रशांत डोंगळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी पुढे बोलतांना प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील म्हणाले की, अत्यंत सामान्य परिवारामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. व त्यांचा वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्यासोबत लग्न झाले. परंतु ज्योतिबा फुले हे सुधारकवादी असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला शिक्षण दिले. आणि भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका होण्याचा मान त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाईंना मिळवून दिला, असेही ते म्हणाले.या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. एम. प्रभूगौडा यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन व कार्यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन हॉसपेटे येथील १९६४ मध्ये स्थापन झालेल्या विजयनगर कॉलेजच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी महात्मा फुले महाविद्यालयातील प्रोफेसर ह.भ.प. डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. मारोती कसाब, प्रोफेसर डॉ. नागराज मुळे , डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. बी.के. मोरे, डॉ. सचिन गर्जे, डॉ. संतोष पाटील, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामनराव मलकापुरे, यांच्यासह विजयनगर महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व एन. सी.च्या विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *