सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे तर प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बालाजी वाघमारे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नवनाथ हांडे, माता पालक संघाच्या सहसचिव प्रियंका पारसेवार, सदस्या स्नेहा हांडे सह आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नवनाथ हांडे व प्रियंका पारसेवार यांच्या वतीने सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील व भाषण स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक बालाजी वाघमारे,नवनाथ हांडे यांचे मनोगत पर भाषण झाले. आशा रोडगे यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश साबणे यांनी केले. सूत्रसंचालन मीना होनराव यांनी केले तर आभार सुजाता बुरगे यांनी मानले.शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.